Breaking News

जामखेड येथे गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा प्रारंभजामखेड ता./प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुले मुली व ऊर्दू शाळेत शासनाच्या गोवर रुबेला लसीकरण मोहीम नान्नज ग्रामपंचायतच्या सरपंच विद्याताई मोहळकर यांसह सर्व पालक विद्यार्था शिक्षक व वैद्यकीय टीम यांच्या उपस्थित राबविण्यात आली. 

देशासह संपुर्ण राज्य जिल्हे तालुका व् ग्रामीण खेडयापाड्यातुन गोवर व रुबेला लसीकरणाची मोहीम गेल्या 27 डिसेंबर पासून मोठया उत्साहात राबविण्यात येत असुन सर्व भागातुन या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आज तालुक्यातील नान्नज येथील जि.प. मराठी मुले मुली व ऊर्दु शाळेत या लसीकरण मोहीमेचा प्रारंभ नान्नज गावच्या विद्याताई मोहळकर, सर्जेराव मोहळकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी व वैद्यकीय टीम यांनी गोवर व रुबेला लसीकरण मोहीमेसंदर्भात पालक व विद्यार्थाना लसीकरणाविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन प्रथम इयत्ता पहीली दुसरी, तिसरी व चौथीच्या मुला मुलींना लस दिली. यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन मलंगणेर, वैद्यकीय अधिकारी सदाफुले, हजारे, मुख्याध्यापक कांबळे, मुख्यध्यापिका मोटे, ऊर्दू शाळेचे आयुब नावीदगी, सातपुते, माने, नंदू परदेशी, फारूक शेख, मनोज कोळपकर, विवेक गर्जे, साजन मोहळकर, बिरू गाडेकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व नागरगोरजे सिस्टर, आशा सेविका सुनिता साळवे, मनिषा साळवे, अर्चना मोरे, सुनिता मोहळकर, प्रियंका होळकर, यांच्यासह महिला, पालक, मोठया संख्येने उपस्थित होते.