Breaking News

समाजात समानतेचा संदेश देणारे क्रांतीकारी थोर संत रविदास महाराज : अशोकसिंह सानंदा


खामगांव,(प्रतिनिधी)ः समाजाला समानतेचा संदेश देणारे समाजवादी संत रविदास महाराजांनी समाजात क्रांतीकारी बदल केला. त्यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे.ते एक थोर संत होते अष्या षब्दात माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी संत रविदास महाराजांना शतशः नमन केले. दि. 14 डिसेंबर रोजी खामगांव येथील चांदमारी भागात संत श्री रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. पुण्यतिथी निमीत्त माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी संत श्री रविदास महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

तद्नंतर चांदमारी चौक येथे सुध्दा संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत रोहिदास महाराज की जय, मन चंदा तो कटौती मे गंगा अष्या घोशणा यावेळी देण्यात आल्या. या कार्यक्रमाला प्रितमभाउ माळवंदे, उत्तम माने, पवन माळवंदे, महादेव गायकवाड, रवि माळवंदे, विजय तासतोडे, पंकज पुरी, महादेव कांबळे, जग्गु गुजर, विजय माळवंदे, चंदुमामा, अमोल डंबरे, विक्की वानखडे, पांडुरंग शिंदे, गजानन हरणे, किशोर कानडे जालिंदर बोर्डे, महादेव शिंदे, सुरेश गायकवाड, गजानन उपाध्ये, अमर माळवंदे, रवि चैधरी, चेतन म्हस्के, अविनाश हुमरे, शिवम कांबळे, गौरव खरात, विषाल घुमरे, आषिश कांबळे, बंटी पवार, प्रमोद काळे, गजानन भवाळ, आतिश शिंदे, बजरंगी चावला, सुनील भटकर यांच्यासह चर्मकार समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.