Breaking News

योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी पहाटे पाच पासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा


अंबाजोगाई : (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गर्शीष नवरात्र महोत्सव १४ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. या दरम्यान महोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच महिला व भाविकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात सुरू असलेल्या किर्तन, प्रवचन, संगीत भजन व गायनाच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवा च्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू झाला आहे. पहाटे पाच वाजल्यापासून महिला व भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. 

वाढती गर्दी व सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सेवेसाठी देवल कमिटीच्या वतीने दररोज सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात दररोज दुुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत आराध बसलेल्या महिलांसाठी किर्तन, प्रवचन, संगीत भजन, सुगम गायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आहेत.