Breaking News

हुंडा प्रतिबंधक दिन उत्साहात साजरा



 बुलडाणा,(प्रतिनिधी):   शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कोलवड येथील श्री स्वयंप्रकाश महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हुंडा प्रतिबंधक दिन, संविधान दिन व मुंबईच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरवर्षी कोलवड येथे श्री स्वयं प्रकाश महाराज संस्थेच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात असंख्य पालक आपल्या मुला मुलीचे लग्न लावतात.

 याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या कार्यालयात हुंडा प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. तसेच यावेळी संविधान दिन व 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला नवनिर्वाचित सरपंच धनंजय पाटील, संस्थाध्यक्ष भगवान जाधव, सचिव शाम खडके, ग्रामविकास अधिकारी पायघन, सदस्य प्रल्हाद पाटील, रामराव जाधव, रमेश सपकाळ, गजानन पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान जाधव यांनी तर आभार प्रदर्शन संस्था सचिव शाम खडके यांनी केले.