Breaking News

उत्तर कोरेगाव परिसरात ट्रान्स्फॉर्मरची चोरी


वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रूक व तडवळे संमत वाघोली गावच्या शिवारातील ट्रान्स्फाँर्मरची मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

 तालुक्याच्या उत्तरेकडील पिंपोडे व तडवळे संमत वाघोली गावच्या शिवारातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी वीज कंपनीच्या दोन ट्रान्स्फाँर्मरची चोरी केली. पिंपोडे बुद्रूकमध्ये तर चोरट्यांनी शेतीपंपासाठी सुरु असलेला चालू वीजपुरवठा खंडित करून त्यातील तांब्याची तार चोरून नेली, तसेच तडवळे गावाच्या शिवारातील ट्रान्स्फाँर्मरची देखील चोरी करण्यात आली आहे. यात महावितरणचे अंदाजे पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली असून याबाबत वाठार ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.