Breaking News

वंचित बहुजन आघाडीच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा -शेख निजाम


बीड, (प्रतिनिधी): देशात व महाराष्ट्रात आगामी येणार्‍या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मागील झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भारतातील प्रमुख पक्षांनी दलित व मुस्लिम व बहुजन समाजाला फक्त आश्‍वासन देवून त्यांच्या मतांच्या जोरावर सत्ता स्थापन केली व दलित, मुस्लिम व इतर बहुजन समाजाचे प्रश्‍न काही सोडवले नाहीत. भारतात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दलित व मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय व अत्याचार करण्यात आला. ज्याची कित्येक उदाहरणे आपल्या समोर आहेत. दलित व मुस्लिम व इतर बहूजन समाजातील लोकांमध्ये सत्तेत जाण्याची क्षमता असून सुध्दा त्यांना सत्तेत स्थान दिलेले नाही व आपल्या पक्षाच्या परंपरेप्रमाणे प्रस्थापित कुटूंबानाच वेळोवेळी सत्तेची दारे खुली केली. आपल्या मागासलेल्या व वंचित असलेल्या दलित व मुस्लिम बहुजन समाजातील बांधवांना सत्तेत पाठवण्यासाठी एमआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खा.असदोद्दीन ओवेसी व भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित समाजाला न्याय देण्याचा विडा उचलला आहे.
येणार्‍या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य वंचित , शोषित समाजाला मोठ्या प्रमाणात न्याय देणार आहे व येणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. ११/१२/२०१८ रोजी मंगळवार सायं. ६ वाजता बशीरगंज चौक बीड येथे वंचित बहुजन आघाडीची प्रचंड जाहिर सभेचे आयाहेजन करण्यात आले आहे. या जाहिर सभेस आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. किसन चव्हाण, मौलाना महेफुजूर रहेमान साहब तसेच आघाडीचे जिल्हा निमंत्रक प्रा.विष्णू जाधव, एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम, भारिपचे जिल्हाध्यक्ष पाटोळे, बबनराव वडमारे, ज्ञानेश्‍वर कवठेकर व सर्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका निमंत्रक एमआयएमआयएम व भारिपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी बीड जिल्ह्यातील सर्व उपेक्षित, वंचित बहुजन समाज बांधवांनी या जाहिर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन एम आय एम आयएमचे जिल्हाध्यक्ष व एआयएमआयएमच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.