बाबरी मस्ज़िद पुन्हा त्याच जागेवर उभारावी मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीनेजिल्हाधिकार्‍यांना निवेदन


नगर - मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक अध्यक्ष आबीद हुसेन यांच्यानेतृत्वाखाली बाबरी मस्ज़िद पुन्हा त्या जागेवर उभारावी या मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांनाजिल्हाधिकारी यांच्या मार्फत गृहखात्याचे प्रमुख यांना देण्यात आले. याप्रसंगी आबीद हुसेन, अझहरकाझी, अक्रम बागवान, आसिफ रजा, अन्वर पटेल, मोहंमद सौदागर, नईम सरदार, सरफराजजहागिरदार, मतीन खान, जहीर काझी, वसीम शेख, जावेद खान, नाजीम शेख आदि उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 6 डिसेंबर 1992 ला जातीयवादी शक्तीनी भारतीयसंविधानाला चिरडून लोकशाहीचा खून करुन तसेच न्याय व्यवस्थेचे चिंधड्या उडवून अक्षरश: पुरातनऐतिहासिक बाबरी मस्ज़िद उध्वस्त करुन देशाच्या संविधानाची खिल्ली उडवून समस्त जगाच्यामुस्लिमांची व धर्मनिरपेक्ष जनतेची धार्मिक व सामाजिक भावना दुखावली त्याला आज 26 वर्षे पूर्णहोत असून, आम्ही अहमदनगरचे मुस्लिम समाज त्या वेळेस केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस,शिवसेना, भाजपा व कट्टरवादी संघटनांचा तीव्र जाहीर धिक्कार व निषेध करीत आहे.

त्यावेळेस केंद्रात सत्तेत असणार्‍या काँग्रेस पक्षाने त्यावेळी देशाच्या मुस्लिमांना आश्‍वासन दिले होतेकी, बाबरी मस्ज़िद पुन्हा त्याच जागेवर उभारण्यात येईल, परंतु आज 26 वर्षे झाले तरी त्यांना त्याआश्‍वासनांचा विसर पडला मात्र नेहमी भाजपाचा धाक दाखवून मुस्लिमांच्या मतांवर डोळा ठेवणे त्यांनीसोडले नाही. भाजपा सेना तर मुस्लिमांचे उघड शत्रूच आहे. त्यांनी तर भारताच्या न्याय व्यवस्थेची पूर्णचेष्टा लावली असून, अशा राजकीय पक्ष ज्यांच्यामुळे समस्त भारताचे नुकसान होत असून, आताभारतीय जनतेने अशा दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या व हिंदू-मुस्लिम समाजात जातिय दंगलीभडकावणार्‍यांचा कायमचा बंदोबस्त करुन बाबरी मस्ज़िद पुन्हा त्याच जागेवर उभारण्यासाठीसरकारवर दबाव टाकावा. मा.राष्ट्रपती साहेब आपणास या निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते आहे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget