Breaking News

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वृद्धाला अटक.


मुंबई : वरळी येथे फायनान्सच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वृद्धाला समाजसेवा शाखेने अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले असून यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक केलेल्यांमध्ये रामिक भाई पटेल (७०) या वृद्धाचे नाव असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरळीच्या महालक्ष्मी को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत गेल्या ३ महिन्यांपासून पटेलने गजालक्ष्मी नावाने फायनान्स कंपनी सुरू केली होती. याच कंपनीच्या नावाखाली तो सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. तेव्हा पटेलने आतमध्ये ३ स्वतंत्र खोल्या तयार केल्या होत्या. त्यातून ३ मुलींना ताब्यात घेतले. त्यात एका अल्पवयीन मुलीचादेखील समावेश असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले..