Breaking News

सातार्‍यात मंगळवारी जिल्हास्तरीय युवा महोत्सव


सातारा,(प्रतिनिधी) : शासनातर्फे येथील शाहू कला मंदिर येथे दि. 11 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. 11 रोजी सकाळी 9.30 वाजता सुरू होणार्‍या या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकीका (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, सितार, बासरी, तबला, विणा, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गीटार, मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थ्क, कुचीपुडी नृत्य, वकृत्व हिंदी/इंग्रजी या कला प्रकाराचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षण पूर्ण झालेले, कला अध्यापनविद्यार्थी, नाट्य मंडळातील कलाकार या सर्वांसाठी हा कलामंच खुले आहे. महोत्सवातील कला प्रकारासाठी प्रवेश विनामूल्य असून प्राविण्य संपादन करणार्‍या कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रवेश निश्‍चिीतीसाठी दि. 10 डिसेंबरपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रवेश अर्ज सादर करावेत.