Breaking News

बोंडारवाडी ग्रामस्थांचा धरणास विरोध


केळघर (प्रतिनिधी) : नियोजित बोंडारवाडी प्रकल्पास विरोध असल्याबाबतचे निवेदन बोंडारवाडी (ता. जावली) येथील ग्रामस्थांनी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे दिले आहे. 

या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की बोंडारवाडी हे गांव वेण्णा नदीच्या काठावर वसलेले असून या नदीच्या पात्राशेजारील आम्हा ग्रामस्थांची अत्यंत सुपिक अशी जमीन आहे. येथील सर्व ग्रामस्थांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. 

बोंडारवाडी येथील नियोजीत प्रकल्पास मंजुरी मिळाल्यास व सुपिक जमिन प्रकल्पात गेल्यास आमच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या निवेदनावर बोंडारवाडीचे सरपंच बाजीराव शंकर ओंबळे, अर्जून ओंबळे, विजयराव ओंबळे, गणपत ओंबळे, संपत ओंबळे, महेंद्र ओंबळे, शंकर ओंबळे, सुनिल ओंबळे, बबन ओंबळे, अशोक मानकुमरे, अरुण जाधव, पांडुरंग ओंबळे, राजू ओंबळे, चंद्रकांत ओंबळे, संतोष ओंबळे आदींच्या सह्या आहेत.