Breaking News

संत तुकाराम विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहातपाटण, प्रतिनिधी) : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मल्हारपेठ येथील श्री संत तुकाराम विद्यालयात आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांना उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. 

इयत्ता 5 वी ते 10 वीदरम्यानच्या विद्यार्थ्यांच्या कबड्डी खो खो लांब उडी, उंच उडी, भाला फेक, क्रिकेट या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समिर कदम, पंचायतसमिती सदस्य सुरेश पानस्कर, अमोल शेटे, तानाजी भिसे, रोहित हिरवे रोहित करंडे, मुख्याध्यापक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ झाला. 

कबड्डी या खेळात सोशल मिडीयातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जोरदार प्रसिद्धी मिळत असल्यामुळे शालेय मुलांमध्ये कबड्डीची मोठी क्रेज निर्माण झाली आहे. इयत्ता 5 वी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व वर्गासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. यातूनच तालुका जिल्हा आणि विभागीय स्तरावरील प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्याचे क्रीडा शिक्षक मोहिते यांनी सांगितले.