दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी नदी नालेखोलीकरणाचा लाभ घ्यावा : गिरी


देऊळगांव मही,(प्रतिनिधी): यंदाच्या वर्षी राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची खरिपाची पीके पाण्याअभावी पूर्ण पणे करपुन गेली. परतीच्या पाऊसाने देखील ऐन वेळेवर पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांनारब्बीच्या पिकासाठी देखील मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने रब्बी पीकेयंदा शेतकरी बांधवांना घेता येत नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी नदी नाला खोलीकरणाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी गणेश गिरी यांनी बीजेएस व कृषि विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने नदी, नाला काल दि.20 नोव्हेबर रोजी मंगळवारला स्थानिकदेऊळगांवमही शेत शिवारात खोलिकरणाच्या शुभारंभा प्रसंगीकेले.यावेळी तालुका कृषि मंडळ अधिकारी विनोद सुसर,कृषि सहाय्यक ढाकणे,बीजेएस तालुका समन्वयक भगवान इंगळे,चेतन भोरजे,तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमोलभाऊ बोबडे, शेतकरी संजय कोटेचा यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


पुढे बोलतांना गिरी म्हणाले की,ज्या शेत शिवारात नदी,नाले, ओढे गांव तलाव असतील त्या शेतकर्‍यांनी खोलिकरण करुण जल पातळी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी.जेणे करुण दुष्काळ सारख्याभयंकर परिस्थितीचासामना करता येईल.भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था यांनी बुलढाणा जिल्हा गाळ युक्त शेती गाळ मुक्त धरण या योजने अंतर्गत संपूर्ण जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी निवड केली आहे.ज्या शेतकर्‍यांना नदी,नाले,ओढे गांव तलाव खोलिकरण करायाचे त्यांना गउइ मशीन उपलब्ध करुण देण्यात येत आहे असे सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी खोलिकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील बीजेएस व तालुका कृषि विभाग मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget