राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ रवाना


सातारा (प्रतिनिधी) : येथील सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व खंडाळा येथील नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा निवड अजिंक्यपद व निवड चाचणी म्हणून सातारा जिल्हा संघ निवडण्यात आला. या स्पर्धेमध्ये मुलींच्या गटाचे विजेतेपद सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळानी सलग 10 व्या वर्षी पटकावले, तर मुलांच्या गटात सदाशिवगड (कराड) यांनी विजेतेपद पटकावले.

सातारा जिल्हा कर्णधारपदी सोनाली हेळवी तर मुलांच्या कर्णधारपदी ऋषीकेश गाढवे यांची निवड करण्यात आली. सातारा जिल्हा संघ परभणी येथे होणार्‍या राज्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धा 2018 दि. 7 ते 10 दरम्यान परभणी (सेळू) येथील स्पर्धेत सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व करेल. संघ पुढीलप्रमाणे मुले सातारा जिल्हा संघ- ऋषीकेश गाढवे सातारा, रोहन शिंगाडे शेरे ता. कराड, ओंकार पालकर सातारा, यश जाधव भुईंज ता. वाई, मारूती कराडे, वैभव भोईटे तडवळे ता. कोरेगाव, संदेश पाटील, आकाश दडस खंडाळा, बोर्डे सुनिल, प्रज्योत मर्ढेकर वाई, विशाल मोहिते सदाशिवगड ता. कराड, मयुरेश फिरमे सदाशिवगड ता. कराड, प्रशिक्षक समीर शिंदे वाई, रामदास गीळे जावळी.

मुली सातारा जिल्हा संघ- सोनाली हेळवी सातारा, नैनिका भोई सातारा, वैष्णवी खळदकर सातारा, श्रद्धा धायगुडे खंडाळा, पल्लवी डांगरे सातारा, ऐश्‍वर्या गिरीगोसावी सातारा, भाग्यश्री तिताडे सातारा, अमृता जुनघरे जावळी, मयुरी ढेरे शिवनगर ता. कराड, प्रतिक्षा जगताप शेरे ता. कराड, प्राजक्ता भिलारे जावळी, विद्या मोरे सातारा. प्रशिक्षक शशीकांत यादव, समीर थोरात. सातारा जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गुरूवर्य बबनराव उथळे, सचिव संग्रामजीत उथळे, उपाध्यक्ष प्रा. उत्तमराव माने, हरिदास साबळे, सायराबानु शेख, प्रा. भरत गाढवे, प्रज्ञा शिंदे, रमेश देशमुख, शशीकांत यादव, समीर थोरात, गोपाळराव माने आदी सदस्यांनी संघास शुभेच्छा दिल्या. तसेच सातारा दोन्ही संघांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेटून सातारा जिल्ह्यास विजेतेपद मिळवून द्यावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget