Breaking News

कर्जत-पुणे बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी; अन्यथा राष्ट्रवादी काँगे्रसचा आंदोलनाचा इशारा


कुळधरण/प्रतिनिधी : दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली कर्जत-पुणे बस सेवा बंद करण्यात आली आहे. ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ओंकार गुंड यांनी या प्रश्‍नावर निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी कर्जत कुळधरण- राक्षसवाडी-अंबालिका कारखाना ही एसटी बससेवा सुरू करण्यात आली. या बसमुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. विद्यार्थ्यांसाठीही ही बस सोयीची होती. मात्र मागील पाच दिवसांपासून ही बस अचानकपणे बंद करण्यात आली आहे. 

त्यामुळे विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक गावातून पुणे येथे जाण्यासाठी ही बस अत्यंत गरजेची होती. बस बंद झाल्याने सध्या प्रवाशांचा मोठा खोळंबा होत असल्याने या प्रश्‍नावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ओंकार गुंड यांनी पुढाकार घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्वरित बस सुरू न झाल्यास मंगळवार दि.1 जानेवारी रोजी कर्जतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या संदर्भात तहसीलदार, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, श्रीगोंदा आगारप्रमुख आदींना निवेदन देण्यात आले आहे.