कोरठणला त्रितपपूर्ती कीर्तन सप्ताह सोहळा


नगर । प्रतिनिधी -
पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे आजपासून (मंगळवार) त्रितपपूर्ती हा 36 व्या वर्षाचा हरिनाम सप्ताह सोहळा सुरू झाला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने हभप डॉ.विकासानंद महाराज मिसाळ हे संत ज्ञानेश्वर माऊली चरित्र कथा सादर करणार आहेत.

दररोज सकाळी 9 ते 12 यावेळात कथा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायं. 7 ते 9 कीर्तन सोहळा, रात्री 9 वा. महाप्रसाद पंगत असे दररोजचे कार्यक्रम आहेत. यात कळस, चिकणेवाडी, सावरगाव, अक्कलवाडी, वाफारेवाडी येथील मानकरी, पिंपळगाव रोठा ग्रामस्थ भाविक यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. सप्ताहात आज (दि. 4) शिवाजी बोर्‍हाडे, उद्या (दि. 5) रवींद्र इंगळे (राहुरी), दि. 6 डिसेंबरला उध्दव बिराजदार (कर्नाटक), दि. 7 रोजी सर्वेश्वरी ताई (बुलढाणा), 8 रोजी सोनाली दीदी (बीड), 9 डिसेंबरला गणेश शिंदे (उदापूर), 10 रोजी दत्तात्रय भोर (संगमनेर) यांची कीर्तनसेवा होणार आहे. दत्त देवस्थान देवगडचे मठाधिपती हभप गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत 10 डिसेंबरला श्री ज्ञानेश्वर कथेची सांगता होणार आहे. तसेच दि. 11 रोजी मिसाळ महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

दि. 13 डिसेंबर रोजी कोरठण देवस्थान येथे मुख्य चंपाषष्ठी उत्सवाचे देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी यांच्याकडून नियोजन सुरू असून, त्रितपपूर्ती सप्ताह कथा सोहळ्यासाठी भाविकांनी सेवा, देणगी देऊन धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, चिटणीस मनीषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget