Breaking News

लक्ष्मी देवी मंदिर रस्त्याचे काम त्वरीत करा- राष्ट्रवादी काँग्रेस


कोपरगाव/प्रतिनिधी 
  कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील धारणगाव रोड ते लक्ष्मीनगर देवी मंदिर तसेच धारणगाव रोड ते हनुमान मंदिर या रस्त्यांचे मागील वर्षी निविदा जाहीर करून भूमिपूजनही झाले होते. परंतु एक वर्ष पूर्ण उलटूनही संबंधित ठेकेदार अथवा नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काम सुरु केले नाही. त्यामुळे या भागात राहणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तसेच हा रस्ता अत्यंत खराब झालेला असल्यामुळे या रस्त्यावर छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना देण्यात आले. याप्रसंगी विजयराव आढाव, विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, ठकाजी लासुरे, संतोष वढणे, तुषार पोटे, साजिद पठाण,  बाळासाहेब दिक्षित, दिलीप आव्हाड, प्रकाश कदम, गजानन वाकचौरे, दीपक पंजाबी, विकास बेंद्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.