Breaking News

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी परिश्रमाची कास धरा : विष्णू शास्त्री महाराज केला हिंदी विद्यालयात पुरस्काराचे वितरणखामगाव,(प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी लक्ष निर्धारित करून जिद्दीने व परिश्रमाने स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी परिश्रमाची कास धरावी, असे आवाहन हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद आश्रमाचे विष्णू शास्त्री यांनी केले. येथील केला हिंदी माध्यमिक विद्यालयात वार्षिक पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी उपरोक्त आवाहन केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगवान किशोर केला हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी उपस्थित होते. शास्त्री बोलताना पुढे म्हणाले की, आपली राष्ट्रभाषा हिंदी असली तरी आज अनेकांना या भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांना अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषेसह अन्य भाषांचे ज्ञान अवगत असणे जरुरीचे नव्हे तर काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. केला हिंदी हायस्कूल, शहरातील अन्य विद्यालय व महाविद्यालयातून दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारे शिखा चौधरी, शहरीश रिबा सय्यद मुजम्मील, सर्वोत्तम खेळाडू गोपेश सेवक, उत्कृष्ट एनसीसी कॅडेट सार्जंट आस्था भुतडा, सनी भोसले, रुक्साना शेख फरिद, अनिकेत जोशी, पारस खिलोशिया, पूजा कुमारी यादव, अरबाज खान फिरोज खान, अशरफ कासीम उदीवाले, रिया सेवक, स्वाती जांगीड, पलक सुरेका, दामिनी श्रीवास्तव, धनश्री पवार, दिया पुरोहित, यास्मीन बेनिवाले, रचना व्यास, सानिका हातेकर, पीयूष सावजी, समृद्धी तिवारी, गौरी मिश्रा यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते केला पुरस्कार, मेडल, शिल्ड, उमंग 40 व अन्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 प्रास्ताविक व संचालन प्रा. एम. एस. द्विवेदी यांनी तर आभार पर्यवेक्षक ए. पी. नागरगोजे यांनी मानले. या कार्यक्रमास मधुसूदन भट्टड, सुभाष मंत्री, अंबालाल गांधी, प्रमोद मोहता, विवेकानंद आश्रमाचे विश्‍वस्त पुरुषोत्तम आकोटकर, प्रा. विजय राठी, पालक, पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.