Breaking News

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी शिरूर पोलीस कटिबद्ध -एमआर काझी


शिरूर कासार (प्रतिनिधी) कायद्याच्या अज्ञानामुळे व पुरेश्या माहिती अभावी आणि गैरसमजुती मधून पोलिसांची निर्माण झालेली अनावश्यक भीती यामुळे महिला व मुली या त्यांचेवर होणारे अत्याचार व अन्याय सहन करत राहतात त्यामुळे मोठं मोठे गुन्हे घडतात म्हणून कसलीही भीती न बाळगता अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एम .आर.काझी यांनी केले ते महिला हिंसाचार विरोधी कायदा , मुस्कान ऑपरेशन व दामिनी पथक वाहतुकीचे नियम या विषयी जनजागृती कार्यक्रमात शिरूर येथे बोलत होते. 


या बाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस प्रशासनाच्या वतीने व विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने महिला हिंसाचार विरोधी कायदा,वाहतुकीचे नियम, बालकांचे अधिकार दामिनी पथक,मुस्कान ऑपरेशन या विषयी जनजागृती शिबीर व कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने शिरुर कासार येथिल समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेत महिला हिंसाचार विरोधी कायदा, दामिनी पथक, मुस्कान ऑपरेशन,वाहतुकीचे नियम, बालकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी एम.आर.काझी हे उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास ग्रामिण विकास केंद्र चे अध्यक्ष तथा शिरूर तालुका विधी सेवा समितीचे विधीदूत समीर पठाण यांची उपस्थिती होती त्यांनी बालकांचे अधिकार व शिक्षणाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले .यावेळी महिला पोलीस अर्चना कोठुळे, बागलाने हे उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका अस्मिता जावळे या होत्या.