Breaking News

प्रभाग चारमधील भाजपच्या उमेदवारांचा ‘होम टू होम’ प्रचारनगर । प्रतिनिधी -
नगर मनपा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असून, प्रभाग चारमधील भाजपच्या उमेदवारांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिल्याचे दिसून येत आहे. या प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधणार्‍या प्रचाराला सर्वसामान्य मतदारांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रभाग चारमध्ये भाजपने तगडा पॅनल दिला आहे. विद्यमान नगरसेवक स्वप्नील शिंदे, चंदर मोतियानी, वंदना शेलार-कुसळकर व संगीता खरमाळे या चार उमेदवारांमुळे भाजपने या प्रभागात मोठे आव्हान उभे केले आहे. लक्षवेधी लढतीमुळे चर्चेत असलेल्या या प्रभागात भाजप जोरदार मुसंडी मारणार असे बोलले जात आहे. हे चारही उमेदवार सध्या ‘होम टू होम’ प्रचारावर भर देत आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधला जात आहे. सर्वसामान्य मतदारांमधून या चारही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.