Breaking News

शेख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरअंबाजोगाई (प्रतिनिधी)- राजे यशवंतराव होळकर होळकर यांच्या जयंतीनिमित्त जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या तर्फे अयोजित सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शिक्षकांना यशवंत रत्न व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. त्या अनुषंगाने सन २०१८ मध्ये श्री.शेख सिराज महंमद प्रा. प.जि. प.मा .शा .डिघोळअंबा ता.अंबाजोगाई यांच्या शैक्षणिक व सामाजिक, साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र गाडेकर,प्रा.भगवान माने,अँड राजीव शिंदे, प्रा.चंद्रकांत भोंडवे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केलेली आहे. सदरील पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृती चिन्ह, सन्मान पत्र असे स्वरूप आहे. सदरील पुरस्काराचे वितरण लवकरच बीड येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे. 

 
शेख सिराज यांनी यापूर्वी सुभेदार मल्हारराव होळकर राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार, शहिद अशफाक उल्ला खॉंन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, साहित्य सेवा गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेआहे. शेख सिराज यांनी विविध दैनिकांतून अनेक विषयांवर लेखन केलेले आहे. शेख सिराज यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना राज्य, जिल्हा, राष्ट्रीय पातळीवर ही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ले आहे. राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये ही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. शेख सिराज यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल निवड झाल्याबद्दल पत्रकार, मित्रपरिवार, शिक्षक मित्रपरिवार, व आप्तेष्टांनी अभिनंदन करून पुढील कार्यासशुभेच्छा दिल्या.