लोणंदमध्ये तीन युवकांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण


लोणंद ,(प्रतिनिधी) : येथील शिरवळ चौकात बुधवारी सकाळी वाहतुकीचे नियमन करताना युवकांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी वाहतूक पोलिस भगवान पवार हे शिरवळ चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. 

त्यावेळी चौकात असणार्या एका हॉटेलसमोर नागेश सूर्यवंशी या युवकासोबत ओमकार गोळे, (रा. गोळेगाव), महेश पवार (रा. सुरवडी), अमित शेळके (रा. लोणंद) यांची भांडणे झाली. रस्त्याच्या कडेलाच ही भांडणे होत असल्याने चौकात वाहतूक कोंडी झाली. तसेच गर्दी झाल्याने वाहनांना जाण्यासाठी जागा नसल्याने पवार त्या ठिकाणी गेले. यावेळी पवार यांनी त्या युवकांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी दोघांनी नागेश याला सोडून पवार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर अन्य एकाने वाहतूक कोंडी करत यामध्ये मध्यस्थी करणार्यांना हटकले. याप्रकरणी पवार यांनी लोणंद पोलिस ठाण्यात ओमकार, महेश व अमित यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवत या तिघांना अटक केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget