Breaking News

चिखली मतदारसंघातील प्रतिभेला निश्‍चित वाव मिळेल : ना.संचेतीचिखली,(प्रतिनिधी): अंगभूत कलागुण आणि क्रीडा नैपुण्य असलेल्या प्रतिभावंतांनी चिखली मतदारसंघात कमतरता नाही. परंतु, आजवर त्यांना पाहिजे तशी योग्य संधी आणि वाव मिळाला नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने राज्यस्तरावर आयोजित केलेल्या सीएम चषक कला व क्रीडा महोत्सवाद्वारे येथील प्रतिभावंताना निश्‍चीतच चांगला वाव मिळेल असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांनी केले.

स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सीएम चषकाचा शुभारंभ ना. चैनसुख संचेती यांच्या हस्ते करण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विविध प्रकारच्या मैदानी आणि बैठ्या खेळांसह रांगोळी आणि गायन स्पर्धेचा समावेश असलेला हा महोत्सव 23 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

आज चिखली नगर पालीका विरुद्ध चिखली पोलीस स्टेशनच्या दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्याद्वारे या कला व क्रीडा महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले, युवामोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मा सचिनबापु देशमुख, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त,संजय चेके पाटील, सुरेशअप्पा खबुतरे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, सुधाकर काळे,देविदास जाधव पाटील, नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे, उपाध्यक्ष वजीराबी शेख अनिस, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, नगर संघचालक शरद भाला, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, विस्तारक अजय बिडवे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधिरजी चेके, समाधान गाडेकर, पवन लढ्ढा, दिलिपजी डागा, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 राजकारणाशी संबंधित नसलेल्या समाजातील क्रीडापटू व कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी सीएम चषकाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. युवा मोर्चाकडे या आयोजनाची जबाबदारी पक्षाने सोपवलेली होती. चिखली विधानसभा मतदार संघातील युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी श्‍वेताताई महाले यांच्याकडे या आयोजनाचे नेतृत्व दिले. त्यांच्या सक्षम नेतृत्वात सीएम चषक स्पर्धांचे नेटके आयोजन करण्यात आले आहे. या गोष्टीची दखल ना. चैनसुख संचेती यांनी आपल्या भाषणातून घेतली. श्‍वेताताई महाले पाटील यांच्यासह चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त हे युवा मोर्चाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याबद्दल संचेती यांनी त्यांचे कौतुक केले. आपल्या आभार प्रदर्शनातून श्रीमती महाले यांनी सर्वांच्या सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.  जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सीएम चषक स्पर्धांतून नवनवे खेळाडू आणि कलावंत पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त केली तर सतीश गुप्त यांनी कला व क्रीडा रसिकांसाठी सीएम चषक ही आगळीवेगळी पर्वणी ठरेल असा विश्‍वास बोलून दाखवला. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले. 

             भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सीएम चषक स्पर्धांचे जिल्हा सहसंयोजक गोपाल देव्हडे, चिखली विधानसभा संयोजक कैलास सपकाळ, सहसंयोजक पंजाबराव धनवे, प्रसिद्धी प्रमुख विजय वाळेकर व नोंदणी प्रमुख आकाश चुनावाले, शिवराज पाटील, विक्की हरपाळे, कल्याणी माळोदे, रूपेश जगताप, चेतन पाटील, मनीष गोंधणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.