Breaking News

विद्यार्थ्यांनो, संधीचे सोने करून यशाचे शिखर गाठा


बीड, (प्रतिनिधी) स्पर्धा परीक्षांचा प्रवास हा खडतर प्रवास आहे. त्यामुळे अभ्यासाचे अथक कष्ठ करा.एवढेच नाही तर संधीची वाट पाहत बसण्याऐवजी विद्यार्थ्यांनी आहे त्या संधीचे सोने करून यशाचे उत्तुंग शिखर गाठले पाहिजे. असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांनी व्यक्त केले.  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात शुक्रवार (दि.१४) डिसेंबर रोजी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद विभागीय ग्रंथालय कार्यालयाचे अधीक्षक अनिल बावीस्कर, सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा ग्रंथालयाचे महाराष्ट्र प्रदेश निमंत्रक राहूल वाघमारे, दिपक सोनवणे, पद्मराज वैराळ,केंद्र प्रमुख प्रा.यशवंत वावळकर आदी उपस्थित होते.