Breaking News

मुख्यमंञ्यांच्या उपस्थितीत देवळा ऍग्रो प्रोड्यूसर- शेतकरी करार


देवळा (वार्ताहर ) येथील देवळा ऍग्रो प्रोड्युसर कंपनीला गो-४ फ्रेश या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीसाठी शेतकरी सभासदांचा शेतमाल व भाजीपाला पुरवठा करणेसाठीचा महत्वपूर्ण करार मुंबईत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी आज शनिवार (ता.८) रोजी दिली. 

यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शेतीव्यवसाय व ग्रामीण वाहतूकिकरण (स्मार्ट) प्रकल्पाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध कंपन्यांमध्ये शेतमाल देणे व घेणे याबाबत करार करण्यात आले. 

यावेळी देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेली देवळा ऍग्रो प्रोड्युसर कंपनीलाही गो-४ फ्रेश या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीसाठी शेतमाल व भाजीपाला पुरवठा करण्याचा ठेका मिळाला. गो-४ फ्रेश कंपनीचे प्रतिनिधी मारुती चापके, कंपनीचे उपाध्यक्ष कारभारी जाधव, देवळा ऍग्रो कंपनीचे संचालक संभाजी आहेर, कार्यकारी अधिकारी शुभम निकम यांच्यासह कंपनीचे संचालक उपस्थित होते. महाराष्ट्र शासन, जागतिक बँक व सी.एस.आर. यांच्या माध्यमातून स्मार्ट प्रकल्पच्या वतीने शासन, शेतकरी कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्यात शेतमाल पुरवठा करण्याबाबत यावेळी हे करार करण्यात आले. या करारामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यास या देवळा ऍग्रो कंपनीला वाव मिळणार असून देवळा येथे सर्व शेतमालाची खरेदी करण्यासाठी कंपनी तयार आहे. एका आठवड्यानंतर लगेचच गो-४ फ्रेश या कंपनीला येथून शेतमाल पोहोच केला जाईल असे कंपनीचे उपाध्यक्ष कारभारी जाधव यांनी सांगितले.