Breaking News

मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा


बीड (प्रतिनिधी) - शहरातील विवेकांनद हॉस्पिटल, भाजी मंडई रोड येथे जर्मन फाऊडेंशन मुंबई , विवेकांनद हॉस्पिटल बीड , जिल्हा रूग्णालय बीडच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२१ ते रविवार २३ डिसेंबर २०१८ दरम्यान जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू, नाक, कान, या वरील बाह्य विकृती, चेहर्यावरील बाह्यविकृती ईत्यादी सारख्या व्यंगावर भव्य मोफत तपासणी व प्लॅस्टिक सर्जरी शिबीराचे सकाळी ठिक ९.०० ते दुपारी ५.०० या वेळेत पत्रकार भवन, भाजी मंडई रोड येथे तपासणी शिबीर तर विवेकांनद हॉस्पिटल येथे शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे