Breaking News

जिल्हा रुग्णालयात मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर


नगर । प्रतिनिधी -
भारतीय जैन संघटना, स्व. चांदमलजी मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट व जिल्हा सिव्हील हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ डॉ. दीक्षितांचे सहकारी डॉ. राज लाला (अमेरिका) यांचे 19 वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर दि. 10 व 11 डिसेंबर रोजी येथील जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आले आहे.

गेल्या 18 वर्षापासून हा उपक्रम नगरमध्ये राबविला जात आहे. हे शिबिर दोन दिवस चालणार असून सोमवारी (दि. 10) सकाळी 9 ते 11 यावेळेत जिल्हा रुग्णालयात नावनोदणी व तपासणी तसेच दुपारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी रुग्णांनी उपाशीपोटी येणे आवश्यक आहे, असे शिबिरप्रमुख शशिकांत मुनोत व आदेश चंगेडिया यांनी सांगितले. शिबिरासाठी सर्व वैद्यकीय तयारी येथील आरएमओ डॉ. एस. पी. पोखरणा यांच्या निगराणीत होणार आहे.

या शिबिरात दुभंगलेले ओठ, पापण्यांमधील विकृती, चेहर्‍यावरील व्रण व नाक-कानवरील बाह्यविकृती यावर मोफत सर्जरी केली जाणार आहे. शिबिर यशस्वीतेसाठी ट्रस्टचे किशोर मुनोत, भारतीय जैन संघटनेच्या नगर शाखेचे मार्गदर्शक शरद मुनोत, अरूण दुगड, अशोक मुथ्था, संजय गुगळे, अभय बोरा, शशिकांत मुनोत, अभिनंदन भन्साळी, रोशन चोरडिया, सागर गांधी, गिरीष आग्रवाल, धीरज गांधी, अभय पुंगलिया, आनंद चोपडा, दीपक बोथरा, अभय लुणिया, अमित गुंदेचा, संतोष कासवा, सचिन भळगट हे प्रयत्नशील आहेत.