Breaking News

शीखविरोधी दंगलीप्रकरणी सज्जन कुमारांना जन्मठेप


1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. शीखविरोधी दंगल भडकवल्याप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र त्यानंतर याचिकाकर्त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. आज उच्च न्यायालयाने सज्जन कुमारांना दोषी ठरवल्याने काँग्रेसला मोठी फटका बसणार असे बोलले जात आहे .