Breaking News

माजी नगरसेवकावर जळगावात गोळीबार
जळगाव/ प्रतिनिधीः
जळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर सोमवारी (ता.31) सकाळी मोटारसायकल वरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडली. पाटील यांच्या छातीत गोळी घुसली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. 


ही घटना सकाळी साडेदहा वाजता घडली. पाटील हे गिरणा नदीकडे शेतात जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. पाटील यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. पाटील यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपत प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेवकआहेत.