Breaking News

रेशीम उत्पादक शेतकर्‍यांची नरेगा ऑपरेटर मुळे हेळसांड-कॉ.कानडेबीड (प्रतिनिधी)- तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थीती असताना नरेगा अंतर्गत रेशीम लागवड करण्याचा प्रस्ताव केला परंतु त्यंच्या अशा वर पाणी फिरवण्याचा ठेका तहसील मधील नरेगा कर्मचारी व ऑपरेटर करत आहेत. जून मध्ये टेक्नीकल मान्यता , ऑगस्ट मध्ये कार्यारंभ आदेश व सप्टेंबर मध्ये वर्ककोड असताना आणखी एक ही मस्टर निघाले नाही. 

तहसील मधील नरेगा ऑपरेटर मुद्दाम होऊन लाभार्थ्यांना त्रास देत आहेत मजूर नोंदणी साठी पंचायतसमिती कडे पाठवत आहेत व पंचायत समिती मधील ऑपरेटर तहसील कडे पाठवत आहेत.आधार व बँक खाते आपडेट करण्यासाठी शेतकरी अक्षरशः पाय पडत असताना विनंती करत असताना त्यांना कसलीच दया येतं नाही.दुष्काळी परिस्थीती सी सामना करावा की सरकारी कार्यालयाशी असा पेच शेतकर्या समोर उभा आहे. ही मजुरांना पंधरा दिवसांच्या आत रोजगार न दिल्यास रोजगार भत्ता हे नरेगा देईल का बीड तालुक्यातील आनेक मजुरांनी मागण्या देऊन तीन महिन्या पेक्षा जास्त काळ झाल आहे.शेतकर्‍याला न्याय न दिल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष तहसील समोरच तीव्रस्वरूपाचे आंदोलन करणार असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवण्यात येतं आहे.