Breaking News

मका पीक कीड रोखण्यासाठी उपाय योजनांचे आवाहन


सातारा,  (प्रतिनिधी) : मका पीकावर सध्या अमेरिकन लष्करी अळीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी. अंडीपुंज व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. या किडीचे नैसर्गिक शत्रु जसे परोपजिवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलेनोमस, चिलोनस) व परभक्षी किटक यांचे संवर्धन करावे. जैविक किटकनाशकाची फवारणी करावी.  ही कीड बहुभक्षी खादाड असून प्रसार होण्याचा वेग जास्त असल्यामुळे तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी केले आहे.