केंद्राच्या दृष्काळी पथकाकडून खामगावात पाहणी
खामगाव,(प्रतिनिधी): भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी बुधवारी दुपारी केंद्रीय पाहणी पथक खामगावात धडकले. या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसीटी मार्केट यार्ड मधील शेतमाल खरेदी प्रक्रीयेची पाहणी केली. तसेच काही शेतकर्यांशी संवाद साधला.
अपुर्या पर्जन्यमानातुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्हा देखील दुष्काळाच्या छायेत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळगस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्य निती आयोगाचे दहा सदस्यीय पथक बुलडाणा जिल्ह्यात धडकले आहे. बुधवारी या पथकातील सदस्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी टीएमसी मार्केट यार्ड मधील सभागृहात शेतकर्यांशी संवाद साधला. काही शेतकर्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
त्यानंतर नाफेड खरेदी केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्राच्या तीन सदस्यीय पथकासोबत जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, सहायक निबंधक सोळंके, डीएमओ शिंगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष टाले, दिलीप पाटील, विलास इंगळे, सुलोचना राऊत आदींची उपस्थिती होती. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्य धान्याच्या दर निश्चितीप्रणालीची माहिती यावेळी केंद्रीय पाहणी पथकाकडून घेण्यात आली. शेतकर्यांना हे दर परवडतात काय? अशी विचारणाही यावेळी पथकातील एका सदस्याने शेतकर्यांना केली. त्यावेळी शेतकर्याने शेत मालाच्या भावासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.
Post a Comment