Breaking News

भीषण अपघातात चौघे जखमी


भुईंज (प्रतिनिधी): पुणे-सातारा महामार्गावरील भुईजच्या कृष्णा नदी पुलावर कार आणि दुचाकीच्या धडकेत तीन गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरुन सातार्‍याकडे सुसाट वेगाने जाणारी इंडिका कार क्र. एमएच 06 एम 5992 हिने समोरुन विरुध्द दिशेने ट्रिपल सीट येणारी दुचाकी (एमएच 11 क्यु 5847) ला भुईज गावच्या हद्दीतील कृष्णा पुलावर जोराची धडक दिल्याने त्यावरील तिघेही आणि कारमधील एक असे चौघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद भुईज पोलिस ठाण्यात झाली आहे. याचा अधिक तपास सपोनि बाळासाहेब भरणे आणि हवालदार धायगुडे करीत आहेत.