Breaking News

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात तबला वादनात अक्षयसिंग राजपूत प्रथमबुलडाणा,(प्रतिनिधी):  शाहीर बाबुसिंग राजपूत कला मंच बुलडाणाचे सदस्य व तुलसी संगीत विदयालयाचे विध्यार्थी अक्षयसिंग अजयसिंग राजपूत यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात तबाला वादनात प्रथम क्रमांक पटकविला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व्दारा जिल्हा क्रीडा संकुल येथे  युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री अक्षयसिंग राजपूत याना लहानपणापासून संगिताची आवड असून एडेड शाळेमध्ये शिकत असतांना स्नेहसम्मेलनात सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अक्षयसिंग हा उत्कृष्ठ ढोलकी व ढोलक पटू असून आपल्या शाहीर बाबुसिंग राजपूत कला मंचच्या प्रत्येक कार्यक्रमात ढोकलीची साथ करीत असतो. अकोला येथिल रमेश शुक्ला यांच्या कडे अक्षयसिंग राजपूत हे तबल्याचे शिक्षण घेत आहे. तबला सोलो वादनासाठी हार्मोनियमची साथ दिपक सांगळे यांनी केली होती. जिल्हास्तरावर पटकविलेल्या प्रथम क्रमांकामुळे हे विभागीयस्तराकरीता पात्र ठरला आहे. त्याच्या यशामुळे सर्व संगीतप्रेमी कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.