Breaking News

विज्ञान प्रदर्शनात डॉ.झाकेर हुसेन ऊर्दू उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश


परळी,(प्रतिनिधी): परळी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने आयोजित केल्या जाणाङया तालुका स्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन येथील राजस्थानी पातेदार लर्न स्कुल येथे दि. ११ ते १३ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध शाळेतील विविध प्रकारचे ८० प्रयोग सादर करण्यात आले होते. उच्चमाध्यमिक ३७ शाळा यामध्ये सहभागी होत्या. त्यात डॉ. झाकेर हुसेन ऊर्दू उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी नदीम खान, सौफ कुरेशी व शेख जियाउर्रहेमान यांच्या प्रयोगास प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी वहाजोद्दीन मुल्ला यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले. यासाठी प्राचार्या पठाण मुनवरी बेगम हसन खान यांनी प्रोत्साहन दिले व बेग शफिउल्ला, बेग हिना मॅडम , पठाण अय्युब खान सर व सरताज सर यांनी मार्गदर्शन केले.