Breaking News

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने केली २१६ रुपयांची मानिऑर्डरप्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निफाड येथील शेतकऱ्याने मनिऑर्डर केली त्यापाठोपाठ येवल्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१६ रुपयांची मनिऑर्डर केली.

येवला तालुक्यातील अंदरसुल येथील रहिवासी शेतकरी चंद्रकांत भिकन देशमुख यांनी पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने विकलेल्या कांद्यातून आलेल्या पैशाची मनिऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने केली.

आधीच दुष्काळी परिस्थिती असल्याने कसा-बसा पिकविलेल्या कांदा चंद्रकांत देशमुख यांनी येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल येथील उपबाजार समिती येथे दि.५ डिसेंबर २०१८ रोजी ५ क्विंटल ४५ किलो कांदा विक्रीसाठी नेला असता उपस्थित व्यापाऱ्यांनी सुरवातीला ५० रुपये क्विंटलची मर्यादा दिल्याने अखेर ५१ रुपये क्विंटल ने त्यांचा कांदा लिलाव झाला.

त्यामुळे घेतलेले कर्ज फेडणार कसे व घर प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांला पडला त्यामुळे चंद्रकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे पोस्टाने २१६ रुपयांची मनिऑर्डर केली.
दरम्यान दि.५ डिसेंबर २०१८ रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती येवला अंतर्गत उपबाजार अंदरसुल येथे
उन्हाळ कांदा - किमान 200 ते कमाल 550 सरासरी 300 ,
लाल कांदा - किमान 300 ते कमाल 882 सरासरी 750 ,
आवक - 40 ट्रॅक्टर 68 रिक्षा/पिकॶप
एकुण आवक अंदाजे 10000 क्विंटल ..

प्रतिक्रिया


शेतकरी चंद्रकांत भिकन देशमुख
सद्यस्थितीत तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने एकमेव कांद्यातुन आलेल्या पैशातुन घेतलेले कर्ज फेडण्यास व घर प्रपंचास मदत मिळाली असती परंतु माझा कांदा चांगल्याप्रतीचा असून देखील ५१ रुपये प्रतिक्विंटल अशा कवडीमोल भावाने कांदा विकला गेल्याने ती आशा देखील धुळीस मिळाली.शेतकरी आत्महत्या का करतो ? त्याचे उत्तर आज मला मिळाले.या कारणांमुळे कांद्याच्या पैशातून मी मुख्यमंत्री साहेबांना २१६ रुपयांची मनिऑर्डर केली.