माजलगाव, (प्रतिनिधी):-दुष्काळामध्ये शेतकर्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई सह , जनावरांच्या दावणीला चारा व पाण्याची सोया करा यासह इतर मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी (दि ०५) रोजी माजलगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात तालुक्यातील शेतकरी, शेतमजूरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन माकपचे नेते कॉ.दत्ता डाके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या मोर्च्यात तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर व किसान पुत्रांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे अवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ दत्ता डाके,तालुकासचिव कॉ बाबा सर,सय्यद याकूब संदीपान तेलगड,मोहन जाधव, विनायक चव्हाण,बळीराम भुम्बे,सुहास झोड़गे,शिवाजी कुरे,भगवान पवार,सुभाष थोरात, सुभाष डाके, सय्यद रज्जाक, नारायण तातोड़े, सुखदेव घुले, जनक तेलगड, रामभाऊ राऊत, यांच्या सह्या आहेत.
Post a Comment