Breaking News

सामाजिक कार्यात शुभम भारत गॅस एजन्सी अग्रेसर : ओंबासे

म्हसवड, (प्रतिनिधी) : ग्राहकांना विनम्र सेवा देण्याबरोबर विविध सामाजिक कार्यात शुभम भारत गॅस एजन्सी अग्रेसर असते. इतर गॅस एजन्सीने शुभम भारत गॅस एजन्सीचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे मत कराड अर्बन बँकेचे शाखाव्यावस्थापक विलास ओंबासे यांनी व्यक्त केले.
म्हसवड, ता. माण येथील शुभम भारत गॅस एजन्सीमार्फत प्रधान मंत्री एलपीजी पंचायत दिनाचे औचित्य साधून उज्वला गॅसचे मोफत वितरण विलास ओंबअसें यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ सूर्यकांत फुटाणे, सुनील पोरे, सौ. सुवर्णाताई पोरे, आप्पा पोरे, करण पोरे, पत्रकार पोपट बनसोडे उपस्थित होते.
समाजसेवेचा वसा घेऊन, दुष्काळी माण तालुक्याचा आधारवड म्हणून काम करणार्‍या शुभम भारत गॅस एजन्सीने प्रधान मंत्री एलपीजी पंचायत दिनाचे औचित्य साधून उज्वला गॅस योजनेचा लाभ घरा घरात पोहचवण्याचे काम करून दुष्काळी माण तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे असे उदगारही कराड अर्बन बँकेच्या म्हसवड शाखेचे व्यवस्थापक ओंबासे यांनी काढले.
सुवर्णाताई पोरे म्हणाल्या, केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेचा लाभ सामान्यांना मिळावा यासाठी शुभम गॅस एजन्सी प्रयत्न करत आहे. साडेचार हजार गॅस कनेक्शनचा लाभ मिळवून देऊन इतर एजन्सीच्या तुलनेत रेकॉर्ड केल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात सुनिल पोरे यांनी उज्वला गॅस योजनेचा लाभ सर्वसामान्य 240 महिलांना दिला असून मोफत वितरण करण्यात आले आहे. यावेळी करण पोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.