वाडीवर्हे जवळ लक्झरी बसला भिषणअपघात; ४ ठार ४० जखमी


वाडीवऱ्हे/प्रतिनिधी- शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख जवळ महामार्गावर अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये दिल्ली, मुंबई येथील प्रवासी असल्याचे समजते. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथून साईबाबा दर्शन करून ५० प्रवासी क्षमतेची लक्झरी बस क्रमांक MH 01 CV 9675 नाशिकडून मुंबईकडे जात होती. मुंबई आग्रा महामार्गावर संध्याकाळी ५.४५ वाजता इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख शिवारात अपघात झाला.

वेगावर नियंत्रण मिळण्यास बसचालकाला अपयश आल्याने ही बस दुभाजकावर जोरदार कोसळली. यानंतर २०० फूट फरफटत ही बस रस्त्यावर आदळली. या गंभीर अपघातात बसमधील ४ जण ठार तर ४० जण जखमी झाले. रुग्णवाहिका सेवेने जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget