Breaking News

दहाव्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी)ः बांधकाम सुरू असताना दोन कामगारांचा दहाव्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये एका रहिवासी इमारतीच्या बांधकामादरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

इमारतीच्या 10 व्या मजल्यावर बांधकाम करत असताना दोन कामगार खाली कोसळले. खाली पडताना हे दोन्ही कामगार पहिल्या मजल्यावर अडकले. या कामगारांचा आवाज ऐकताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने कामगारांना खाली काढण्यात आले; पण जबर मार लागला असल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षेबाबत इतका निष्काळजीपणा करण्यात आल्याबद्दल सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे.