Breaking News

बानेगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
माजलगाव, (प्रतिनिधी):-माजलगाव शहरापासून जवळच १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पाथरी तालुक्यातील बानेगाव शिवारात एका २५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. नातेवाइकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या पाथरी तालुक्यातील बानेगाव शिवारात गोवर्धन महादेव नाईकवाडे या पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. याबाबतीत समजलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री मयत गोवर्धन नाईकवाडे हे मित्राच्या शेतात मित्रांसोबत जेवणाची पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर बर्‍याचवेळाने रस्त्यावर ते मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे दिसून आले.

 ही खबर नातेवाईकांना समजल्यानंतर ते त्या ठिकाणी गेले त्या वेळेस मृताच्या डोक्याला आणि कंबरेला मार लागल्याचे निदर्शनास आले. ते कोणासोबत मोटारसायकल गाडीवर आले होते का ? स्वतः गाडी चालवत आले होते ? त्या ठिकाणी कोणतीही मोटारसायकल गाडी नव्हती. त्याच पद्धतीने त्यांच्या खिशातील मोबाईल गायब करण्यात आला असल्याचेही नातेवाइकांच्या निदर्शनास आले.

 अशाच पद्धतीच्या काही संशयास्पद बाबी मृत्यू शरीराजवळ आढळून आल्याने हा अपघात आहे की, घातपात ! याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. सदरील प्रकार घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शवविच्छेदनासाठी बॉडी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली असून माजलगाव/ पाथरी ग्रामीण पोलीस यासंदर्भात तपास करत असून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.