Breaking News

लाच प्रकरणी केंद्रे व चोटपगार यांना एक दिवासाची पोलीस कोठडी


अंबाजोगाई (प्रतिनिधी) - दोन महिन्याचा पगार काढण्यासाठी आणि जी पी एफ चा ९० हजाराचा चेक काढण्यासाठी भावठाणा आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याला (तक्रार) २५ हजाराची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार हा भावटाना आरोग्य केंद्रात शीपाई आहे. याच आरोग्य केंद्रातील आरोपी डॉ. महादेव केंद्रे आणि कंपाउंडर प्रशांत चोटपगार यांनी पैशाची मागणी केली होती. 

हताश झालेल्या तक्रारदार शिपायाने बीडच्या एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची कार्यवाही शनिवारी दि १५ डिसेंबर१८ रोजी दुपारी१२:०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली. कार्यवाहीमध्ये आरोपी डॉ.माधव केंद्रे आणि कंपाउंडर प्रशांत चोटपगार या दोघांना पथकांनी भावटाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचून २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडून कार्यवाही करण्यात आली.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील आरोपींना आज दि.१६/१२/१८ रोजी अंबाजोगाई येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सरकारी वकील ऍड. राम ढेले यांनी काम पाहिले.