Breaking News

काँगे्रसच्या जनसंघर्ष यात्रेचा चिखलीतील विराट सभेत होणार समारोप समारोप सभेपुर्वी निघणार भव्य संविधान बचाओ मोटारसायकल रॅलीचिखली,(प्रतिनिधी): केंद्रातील व राज्यातील भाजपा शिवसेना सरकारकडुन आश्‍वासनाची पुर्तता नाही, महागाई, बेराजगारी, भ्रष्टाचार, यामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. राज्य दुष्काळात होरपळते मात्र सरकार उपाय योजना करीत नाही, या सर्व जनतेच्या प्रश्‍नांना वाच्या फोडण्यासाठी काँगे्रसची अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेचा चोैथ्या टप्याला यवतमाळ येथून सुरूवात झाली असुन अमरावती, अकोला, वाशिम, या जिल्हयातुन प्रवास करीत ही यात्रा बुलडाणा जिल्हयात दाखल झाल्यावर या यात्रेचा समारोप 9 डिसेंबर रोजी चिखलीत येथे संपन्न होणार्‍या विराट सभेने होणार आहे.

कॉग्रेस पक्षातील अनेक मान्यवर दिग्गजांच्या उपस्थितीत होणार्‍या या विराट सभेची पुर्व तयारी चिखलीत बुलडाणा जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात सुरू असुन या समारोप सभेपूर्वी परीसरात विशाल अशा संविधान बचाओ मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.    देशात संविधानात बदल करून सर्व सामान्य नागरीकांवर अन्याय करणारे मनुस्मृर्ती लागु करण्याचे कुटील कारस्थान काही जातीय वादी मंडळीकडुन सुरू आहे. त्याला केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचा छुपा पाठींबा असल्याचे अनेक घटनांवरून जनतेच्या लक्षात येते आहे. पंरतु भारताचे संविधान हटविले गेल्यास या देशात अराजक माजुन या देशाची घडी विस्कटून जाईल, त्यासाठी भारतीय संविधान कायम राहीले व त्याला कोणीही धक्का लावु नये, यासाठी काँगे्रस पक्षाकडुन विरोध केला जातो आहे.  म्हणुनच जनसंघर्ष यात्रेच्या समारोप समारोपीय कार्यक्रमा पुर्वी चिखली येथे हजारो मोटारसायकल स्वारांची भव्य अशी संविधान बचाओ मोटारसायकल रॅली परिसरातून काढण्यात येवून जनभावना व्यक्त केल्या जाणार आहे.

        चिखली येथे दुपारी 12ः30 वाजता राजा टॉवर येथे संपन्न होणारी या सभेची व संविधान बचाओ मोटरसायकल रॅलीची तयारीही काँगे्रस पक्षाकडून जोमात सुरू असुन या सभेला जास्तीत जास्त सहभागी  व्हावे यासाठी घाटमाथ्यावरील मेहकर, सिंदखेड राजा, चिखली  व बुलडाणा या विधानसभा मतदार संघातील कॉगे्रसचे सर्व पदाधिकारी आणि नेते सतत जनसंपर्कात असून जास्तीत जास्त नागरीका पर्यंत पोहचुन त्यांना या कार्यक्रमाची माहिती दिली जाते आहे. आणी नागरीकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येते आहे.