Breaking News

नेत्यांची पाण्याच्या श्रेयाची लढाई तर कार्यकर्ता कांद्याला दर नसल्यामुळे संकटात


बिदाल, (प्रतिनिधी) : माण तालुक्यात दुष्काळामुळे कांदा व डाळिंब पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर तालुक्यातील राजकीय नेते आ जयकुमार गोरे, डॉ दिलीप येळगावकर, आनिल देसाई, प्रभाकर देशमुख यांच्यात उरमोडीच्या पाण्यावरून सध्या पाण्याच्या श्रेयाची लढाई सुरू आहेत. मात्र दुसरीकडे गरीब कार्यकर्ता व शेतकर्‍यांच्या कांद्याला दर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेल्या दिसत आहेत. 

माण तालुक्यामध्ये बिदाल, मलवडी, देवापूर, नरवणे, आंधळी, राणंद, पळशी, बिजवडी, टाकेवाडी, गोंदवले, शिखर शिंगणापूर, कुकुडवाड आदी गावातील परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या कांदाला पाचशे रुपये पेक्षा कमी तर डाळिंबाला 40 ते 120 दरम्यान दर मिळत आहे.माण तालुक्यात बाजारपेठ नसल्यामुळे कांद्याचे निर्यात आटपाडी, सांगोला, सांगली, कराड, लोंणद, विटा, कराड, फलटण बारामती या बाजारपेठमध्ये केली जाते. माण तालुक्यातील राजकीय नेते पाण्याच्या लढाईवरून एकमेकांवर टीका करत करत आहेत मात्र शेतकर्‍यांच्या डाळिंब व कांद्याच्या दरावर काहीच बोलत नाहीत.

 मागील महिन्यात राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा वाघमोडेवाडीत झाला मात्र कांदाला व डाळिंबला दर कसा मिळेल या विषयावर नेते काहीच बोलले नाहीत. खासदार होण्यासाठी प्रभाकर देशमुख गावोगावी फिरतात मात्र शेतकर्‍यांना डाळिंब व कांदाला चांगले पैसे कसे मिळतील यावर बोलत नाहीत. मंत्री सदाभाऊ खोत हे लोकसभाचे उमेदवार असताना शेतकर्‍यांनी मतदान केले. मात्र माण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या बांधावर आले नाहीत. आ जयकुमार गोरे यांनी कांदा व डाळिंब दरावर विधानसभेत आवाज उठवला नाही. सर्वच राजकीय नेते शेतकर्‍यांना भेटत आहेत मात्र शेतकर्‍यांच्या शेतकर्‍यांसाठी आंदोलन करत नाहीत. 

तालुक्यातील शेतकरी संघटना व शिवसेना हे शेतकर्‍यांच्या पिकाच्या दरासाठी आता आंदोलन करत नाहीत.सध्या कांदाला व डाळिंबला आतिशय दर कमी असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेल्या दिसून येत आहे.
दरम्यान, माण बाजार समिती शेतकर्‍याच्या पिकांला दर कसा मिळेल याकडे संचालक मंडळाचे लक्ष नाही हे दिसून येते. माण तालुक्यात कांदाची व डाळिंब पिकांचे सर्वत्र बाजारपेठ व संशोधन केंद्र सरकारने तयार करावे हि शेतकर्‍यांची मागणी आहे.