Breaking News

रखडलेला कोळीवाड्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवलाकल्याण : मुंबईसह उपनगरे व कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कोळी-भोई समाजाच्या मच्छीमार बांधवांचा जागेचा प्रश्न गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कोळी महासंघातर्फे अध्यक्ष आ. रमेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानले. कल्याणमध्ये आयोजित आगरी-कोळी महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. .

ही बाब निदर्शनास आणल्यानंतर मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी मुंबई परिसरातील ४२ कोळीवाडे व भोईवाड्यातील मच्छीमार महिला भगिनींना फायबरचे बॉक्स वापरण्यास परवानगी देत दहा हजार बॉक्सचे वितरणही केले. विधान परिषदेत कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल आ. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे समस्त कोळी समाजातर्फे जाहीर आभार मानले. .परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाबांधवांची हक्काची जागा असलेल्या कोळीवाड्यांचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला होता. ५० वर्षांत एवढी सरकारे आली आणि गेली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळीवाड्यांचे सीमांकन करून त्यांना त्यांची हक्काची जागा मिळवून देण्याचा निर्णय याच विधिमंडळ अधिवेशनात घेतला. मुंबई परिसरात वास्तव्य असलेल्या कोळी बांधवांच्या जागेचे सर्वेक्षण करून सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा व अन्य जिल्ह्यांतील कोळी बांधवांना जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र मिळण्याचा प्रश्न भेडसावतो. मात्र, या प्रश्नातही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र सुलभभारतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. प्लॅस्टिक व थर्माकोलवरील बंदीमुळे मासे साठवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. .