Breaking News

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन नवे मुख्य आर्थिक सल्लागारनवी दिल्ली: ’इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये कार्यरत असलेले डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णमूर्ती हे पुढील तीन वर्षे या पदावर कार्यरत राहतील. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे सध्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अ‍ॅनालिटिकल फायनान्स विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. अरविंद सुब्रमण्यन यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी सरकारने 30 जून रोजी अर्ज मागवले होते.