Breaking News

कर्मवीर पाटीलांचा थोर वारसा शरद पवार यांनी समर्थपणे पुढे चालू ठेवला - अरुण कडूराहुरी/प्रतिनिधी
रयत संकुल,सात्रळ येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण मा.शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. रयत संकुल, सात्रळ व मा.शरदचंद्रजी पवार यांचे फार स्नेहाचे ऋणानुबंध आहेत. जाणता राजा म्हणून त्यांना संबोधले जाते. शरद पवार म्हणजे चालता बोलता असा ज्ञानकोश आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नामांतराचा प्रश्‍न असो, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांचा प्रश्‍न असो या सर्व प्रश्‍नांची त्यांनी पोटतिडकीने सोडवणूक केलेली आहे. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत संकुलाचे प्रा. डी.बी. गोसावी यांनी केले. 

यावेळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अरुण कडू, बबनराव कडू, संभाजीराजे चोरमुंगे, सुरेश कुलकर्णी, आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना पंकज दिघे यांनी मांडली तर जाधव एन.एन.यांनी अनुमोदन दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,प्राचार्य बी.बी.गोसावी, कोहकडे बी.डी, पठाण वाय.एफ, दिघे एस.डी, मन्सुरी एस.एस, मुसमाडे के.पी, वाघ ए.बी. शहाणे आर.एन, राशिनकर टी.एस, प्रा.विलास दिघे,प्रा,राजेंद्र चौधरी,प्रा.संजय डुबे, प्रा.किशोर दातीर, प्रा.पंकज दिघे , विसावे व्ही.व्ही, कुलथे पी.बी, थोरात .आदींनी परिश्रम घेतले.