Breaking News

परळीत रेल्वेखाली सापडून युवक ठार


परळी(प्रतिनिधी) :- भिमवाडी येथील रहिवासी सत्यपाल प्रकाश लांडगे या (२५) वर्षीय युवकाचा रेल्वेच्या खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. 

या बाबत वृत्त असे की, बरकत नगर येथे सेंट्रींगच्या कामासाठी गेलेला सत्यपाल लांडगे या युवक रेल्वे ट्रककडे गेला असता नांदेड बेंगलोर एक्सप्रेस रेल्वे खाली सापडल्याने दुर्दैवी मृत्यु झाला असुन भिमवाडी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छदन करुन नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.