Breaking News

बीडमध्ये घरफोडीबीड, (प्रतिनिधी):- शहरातील काझी नगर भागामध्ये अज्ञात चोरट्यांने घरात प्रवेश करुन ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील काझीनगर येथील दिलीप कानडे हे काल सकाळी मॉर्निंगवॉकला गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करुन कानडे यांची पॅन्ट व घरातील महिलेचा पर्स लंपास केला. चोरट्याने ४५ हजार रुपयांची रोकड आणि तीन मोबाईलही चोरल्याचे काल सकाळी उघडकीस आले.