Breaking News

उमा भारतीही नाही लढवणार लोकसभेची आगामी निवडणूक


भोपाळ ः केंद्रीय मंत्री उमा भारती या 2019मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुका लढणार नाहीत. त्यांनीच ही घोषणा त्यांनी स्वत: भोपाळमध्ये केली आहे. पुढची साडेतीन वर्ष निवडणुका लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

उमा भारती म्हणाल्या की, गंगा आणि राम मंदिरसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी पुढची साडेतीन वर्षे कोणत्याही निवडणुका लढणार नाही. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव सुषमा स्वराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वराज यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच आपल्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाबाबत स्वराज यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनाही माहिती दिली. आता उमा भारती यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे सांगितले. भाजपच्या दोन फायर बँ्रड नेत्या आता लोकसभेत असणार नाही.