गोवर-रूबेलासंदर्भात डब्ल्यूएचओच्या अधिकार्‍यांनी केले मुस्लीम बांधवांच्या गैरसमजुतींचे निराकारणबुलडाणा,(प्रतिनिधी) : राज्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सोशल मीडियामधून ’व्हायरल’ अफवांमुळे मुस्लिम समाजामध्ये निर्माण झालेल्या गैरसमजुतींचे निराकरण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. मुजीब सय्यद जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले आहेत. त्यांनी 5 डिसेंबर 2018 रोजी बुलडाणा व खामगाव तालुक्यांना भेटी देऊन आरोग्य, शिक्षण विभागाचे अधिकारी, मुस्लिम समाजातील डॉक्टर्स, पदाधिकारी, पत्रकार, पिंपळगाव राजा येथील मस्जिदचे इमाम आणि मुस्लिम समाजबांधवांच्या बैठकी घेतल्या. तसेच आज 6 डिसेंबर रोजी मलकापूर येथील शाळा, उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषद आदी कार्यालयात डॉक्टर्स, पदाधिकारी, अधिकारी व पालकांच्या सभा घेऊन त्यांनी माहिती दिली. शाळेमध्ये उपस्थित पालकांनी सभेच्या शेवटी प्रश्‍न विचारले. या मोहिमेविषयी शंका समाधान झाल्यानंतर त्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.

 या कार्यक्रम, बैठकांमध्ये त्यांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने गैरसमजुती आणि तथ्ये या विषयावर प्रकाश टाकत सविस्तर माहिती दिली. बालकांच्या आरोग्यासाठी आणि निरोगी समाजासाठी निर्मितीसाठी गोवर रुबेला लसीकरणाचे महत्व पटवुन दिले. लसीकरण सक्षमीकरण जिल्हास्तरीय कृती समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुगराजन एस यांचे मार्गदर्शनामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे, शिक्षणाधिकारी डॉ श्रीराम पानझाडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जैनुद्दीन मकानदार, शिक्षणाधिकारी सुभाष वराडे यांचेसह आरोग्य, शिक्षण व महिला बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गत 8 दिवसांमध्ये 2 लक्ष 1 हजार 489 पात्र 9 महिने ते 15 वर्ष पर्यंतच्या लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget